साहित्यरत्न, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे (१ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९)
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे (१ ऑगस्ट १९२०–१८ जुलै १९६९). कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक होते. आपण जरी अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखत असु तरी अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव ” तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे” असे आहे. अण्णाभाऊ साठे हे हिंदू धर्मातील मांग समाजात जन्मलेले समाज सुधारक होते. अण्णा भाऊ यांच्यावर आंबेडकरवादाचा प्रभाव होता. अण्णाभाऊ भाऊ साठे यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले नाही तरी देखील त्यांनी अक्षर ज्ञान प्राप्त करून घेतले. स्वतंत्र पूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात देखील अण्णाभाऊ साठे यांनी राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्र राज्यात पूर्णता जनजागृती केली.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुद्धा अण्णाभाऊ साठे यांचा मोलाचा वाटा होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्राम यांसारख्या आंदोलनांमध्ये त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. सन 1944 ला अण्णाभाऊ साठे यांनी “लाल बावटा” या नावाचे पथक स्थापन करून या पथकाचे कार्य संपूर्ण देशभरात पसरविले होते. अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या अनेक लावण्या आणि चित्रपट आज खूप प्रसिद्ध आहे. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ साठे या पावसाची पर्वा न करता ते शिवाजी पार्कवर हा नारा देत उभे राहिले होते. अण्णाभाऊंच्या शेवटच्या काळ मात्र हलाखीत गेला. दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले. मराठी साहित्यातील प्रतिष्ठानकडून त्यांची तशी उपेक्षाच झाली. विपन्नावस्थेत गोरेगावच्या सिध्दार्थनगरात त्याचं निधन झाले.
अण्णा भाऊ साठे यांचे लेखन साहित्य :
अण्णा भाऊ साठेंनी ३५ कादंबऱ्या मराठी भाषेत लिहिल्या आहेत. त्यात फकीरा चा समावेश आहे. जिला राज्य सरकारचा १९६१ मध्ये सर्वोत्कृष्ट कादंबरी चा पुरस्कार मिळाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण त्यांनी केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. अण्णा भाऊ साठेंनी याच्या व्यतिरिक्त १२ पटकथा, नाटक, मराठी पोवाड्यातील १० गाणे लिहिली. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.
अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा (कादंबरी/पुस्तके)
Ø अकलेची गोष्ट (लोकनाट्य, १९४५)
Ø अण्णा भाऊ साठे : प्रातिनिधिक कथा (संपादक – डाॅ. एस.एम. भोसले)
Ø अमृत
Ø आघात
Ø आबी (कथासंग्रह)
Ø आवडी (कादंबरी)
Ø इनामदार (नाटक, १९५८)
Ø कापऱ्या चोर (लोकनाट्य)
Ø कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह)
Ø खुळंवाडा (कथासंग्रह)
Ø गजाआड (कथासंग्रह)
Ø गुऱ्हाळ
Ø गुलाम (कादंबरी)
Ø चंदन (कादंबरी)
Ø चिखलातील कमळ (कादंबरी)
Ø चित्रा (कादंबरी, १९४५)
Ø चिरानगरची भुतं (कथासंग्रह), १९७८)
Ø नवती (कथासंग्रह)
Ø निखारा (कथासंग्रह)
Ø जिवंत काडतूस (कथासंग्रह)
Ø तारा
Ø देशभक्त घोटाळे (लोकनाट्य, १९४६)
Ø पाझर (कादंबरी)
Ø पिसाळलेला माणूस (कथासंग्रह)
Ø पुढारी मिळाला (लोकनाट्य, १९५२)
Ø पेंग्याचं लगीन (नाटक)
Ø फकिरा (कादंबरी, १९५९)
Ø फरारी (कथासंग्रह)
Ø मथुरा (कादंबरी)
Ø माकडीचा माळ (कादंबरी, १९६३)
Ø रत्ना (कादंबरी)
Ø रानगंगा (कादंबरी)
Ø रूपा (कादंबरी)
Ø बरबाद्या कंजारी (कथासंग्रह, १९६०)
Ø बेकायदेशीर (लोकनाट्य, १९४७)
Ø माझी मुंबई (लोकनाट्य)
Ø मूक मिरवणूक(लोकनाट्य)
Ø रानबोका
Ø लोकमंत्र्यांचा दौरा (लोकनाट्य, १९५२)
Ø वारणेचा वाघ (कादंबरी, १९६८)
Ø वैजयंता (कादंबरी)
Ø वैर (कादंबरी)
Ø शेटजींचे इलेक्शन (लोकनाट्य, १९४६)
अण्णा भाऊ साठेंवर लिहिलेली पुस्तके :
Ø अण्णाभाऊंचा संदेश (विनिमय पब्लिकेशन्स)
Ø अण्णा भाऊ सांगून गेले (विलास रणसुभे)
Ø अण्णा भाऊ साठे (मराठी कवी) – लेखक: बजरंग कोरडे, अनुवाद : विलास गिते, प्रकाशन : साहित्य अकादमी
Ø अण्णा भाऊ साठे (बालवाङ्मय, लेखक – बाबुराव गुरव)
Ø अण्णा भाऊ साठे (हिंदी, प्रा. रतनलाल सोनग्रा)
Ø अण्णा भाऊ साठे (डाॅ. संजीवनी सुनील पाटील)
Ø अण्णा भाऊ साठे : चरित्र आणि कार्य – विजयकुमार जोखे, नालंदा प्रकाशन
Ø अण्णा भाऊ साठे विचारधन (विठ्ठल साठे)
Ø अण्णाभाऊ साठे व्यक्ती आणि वाङ्मय ( प्रा.डॉ. अंबादास सगट)
Ø अण्णा भाऊ साठेलिखित ‘फकीरा’ची समीक्षा (डॉ.श्रीपाल सबनीस)
Ø क्रांतिकारी अण्णाभाऊ साठे (प्रा. गौतम निकम)
Ø समाज सुधारक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (संपादित, संपादक – ॲड. महेंद्र साठे)
अण्णा भाऊ साठेंच्या लेखनावर आधारित चित्रपट :
Ø वैजयंता (१९६१, कादंबरी – वैजयंता)
Ø टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी – आवडी)
Ø डोंगरची मैना (१९६९, कादंबरी – माकडीचा माळ)
Ø मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी – चिखलातील कमळ)
Ø वारणेचा वाघ (१९७०, कादंबरी – वारणेचा वाघ)
Ø अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी – अलगूज)
Ø फकिरा (कादंबरी – फकिरा)
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे विषयक निवडक लेख, ग्रंथ, प्रबंध व इतर साहित्य.
ग्रंथ : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे निवडक वाड्मय, संपादक : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, १९९८ |
|
ग्रंथ : भारतीय साहित्याचे निर्माते: अण्णा भाऊ साठे , लेखक- बजरंग कोरडे |
|
Book: THE LIFE AND WORK OF ANNABHAU SATHE A MARXIST-AMBEDKARITE MOSAIC by MILIND AWAD,2010 |
|
लेख : अण्णा भाऊ साठे यांचे सामाजिक तत्वज्ञान |
|
Article : ANNABHAU SATHE - THE WRITER OF INNER FEELINGS OF DOWNTRODDEN |
|
प्रबंध : अण्णा भाऊ साठे व्यक्ती आणि वाड्मय |
|
प्रबंध : अण्णा भाऊ साठे समाजविचार आणि साहित्य विवेचन |
|
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे उपलब्ध असणारी अण्णाभाऊ साठे लिखित ग्रंथसंपदा यांची यादी |
No comments:
Post a Comment