जी माणसाच्या खर्या मूल्यांचे मूल्यांकन करते
आणि त्याला आयुष्यात पुढे नेते.
-स्वातंत्र्यवीर सावरकर
शक्ति आणि बुद्धि हे दोन्ही गुण एकत्र एका व्यक्तिमध्ये फार क्वचितच आढळून येतात. स्वा. विनायक दामोदर सावरकर ही अशी एक व्यक्ती होवून गेली, जिच्या व्यक्तिमत्वात हे दोन्ही गुण ठायी ठायी दिसून येतात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे, इ.स. १८८३ मध्ये जन्मगाव भगूर(जिल्हा नाशिक ) येथे झाला . हे थोर क्रांतिकारक,मराठी भाषेचे कवी व लेखक होते. हिंदुत्वाचे संघटक तसेच आग्रही ,भाषाशुद्धी तसेच लिपीशुद्धीचे प्रणेते. प्रखर विज्ञानवादी संस्कृत प्रचुर, साहित्यिक, कवी, नाटककार, लेखक, जातीभेदाचे तीव्र विरोधक स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील महत्वाचे राजकारणी व हिंदुसंघटक होते. सावरकर लहानपणापासून बुद्धिमान होते,आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ त्यांनी घेतली.
वयाच्या सोळाव्या वर्षी भारताला स्वतंत्र करण्याची शपथ त्यांनी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम पाळली. वयाच्या तिसाव्या वर्षी ५० वर्षे काळे पाणी अशी सर्वात मोठी शिक्षा झालेला हा जगातील एकमेव देशभक्त. ज्यांच्या साठी इंग्लंडच्या पंतप्रधानाने माफी मागितली आणि फ्रान्स पंतप्रधानाने राजीनामा दिला असा एकमेव क्रांतिकारक म्हणजे सावरकर. भारतास स्वातंत्र्य मिळवण्यात सिंहाचा वाटा सावरकरांचा होता. मात्र जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सावरकर कुटुंब मुंबईस जिवंत होते मात्र ध्वजारोहण सोहळ्याचे साधे निमंत्रणही गांधी-नेहरुंच्या हिंदुस्थान शासनाने त्यांना दिले नाही. सतत त्यांचा अपमान केला, त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला. १९४८ ला महात्मा गांधीवध झाला आणि नेहरु शासनाने सावरकरांवर गांधी हत्येचा आरोप ठेऊन त्यांनावयाच्या ६५ व्या वर्षी कैद केले. पुढे पुन्हा नेहरु-लियाकत भेटीच्या वेळी वयाच्या ७० व्या वर्षी तुरुंगात टाकले. पण तरीही या महापुरुषाने चकार शब्द काढला नाही. थोडक्यात काय तर ब्रिटीशांनीही सावरकरांना त्रास दिला आणि हिंदुस्थान शासनानेही त्रासच दिला. त्यांची शासनाने हिरावून घेतलेली जमिन त्यांना परत केली नाही.
पुढे भारत-पाकिस्तान युद्धात भारताने विजयश्री खेचून आणली, तरीही भारताने अन्यायकारक अटी मान्य करून अख्या जगात अपमान करुन घेतला तेव्हा सावरकर म्हणाले, 'यापेक्षा अधिक मी भारताचा झालेला अपमान सहन करु शकत नाही'. असे म्हणून त्यांनी अन्नत्याग केला आणि २६ फेब्रुवारी, १९६६ ला आपला देह ठेवला. या थोर क्रांतीकारकाने लहान वयापासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एक क्रांतिकारक म्हणून महान कार्य केले, अश्या थोर स्वातंत्र्य सैनिकाला आपण सतत स्मरणात ठेवायला पाहिजे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे-
Literature on Swatantryaveer Savarkar |
|
SWATANTRYAVEER VINAYAK DAMODAR SAVARKAR by Loksabha Secretariat ,New Delhi |
|
अंदमानच्या अंधेरीतून,लेखक- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर |
|
आत्मचरित्र माझ्या आठवणी , लेखक- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर |
|
हिंदूराष्ट्र दर्शन, लेखक- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर |
|
E-books & Documents on Swantantraveer Savarkar (Marathi, Hindi, English) |
|
The Life of Barrister Savarkar by Chitragupta |
|
Essentials of Hindutva by Swantantraveer Savarkar |
|
List of Books on/by Swatantryaveer VinayakDamodar Savarkar |
No comments:
Post a Comment