डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम (जन्म- १५ ऑक्टोबर, १९३१ मृत्यू - २७ जुलै, २०१५)
डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम हे प्रख्यात भारतीय वैज्ञानिक, अभियंता
आणि भारताचे 11 वे राष्ट्रपती होते. त्यांनी देशातील काही महत्त्वाच्या संस्थांमध्ये (डीआरडीओ आणि इस्रो) सेवा
बजावली. 1998 च्या पोखरन -2 अणु चाचणीतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. डॉ. कलाम हे भारताच्या अंतराळ कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास
कार्यक्रमात सहभागी होते. ते या कारणास्तव त्यांना
"मिसाईल मॅन" असेही म्हणतात. 2002 मध्ये
कलाम हे भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि 5 वर्षांच्या कार्यकार्यळानंतर ते शिक्षण, लेखन
आणि सार्वजनिक सेवेत परत गेले. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व
१९९८ मध्ये 'भारतरत्न' हा
सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम, हे
युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. डॉ.
ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात
येतो.
डॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी.
जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे झाला होता. कलाम यांनी
आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने
डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत
व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची
त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल
झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास
इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही
त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या
संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी
अमेरिकेतील 'नासा' या
प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे कार्य:
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र
विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ
लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक
कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा
सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या
वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र
विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले.
पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या
दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे
वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन
बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची
भूमिका पार पाडली.
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या
कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७
जुलै, २०१५ रोजी अखेरचा श्वास
घेतला. संदर्भ : https://marathi.webdunia.com/
डॉ.ए.पी.जे.
अब्दुल कलाम यांचे विषयक ग्रंथ, लेख, प्रबंध व माहिती
Wings of Fire |
|
Ignited Minds |
|
Life of Dr APJ Abdul
Kalam |
|
APJ Abdul Kalam The
President of India: An Annotated Bibliogranhy (MLIS
Thesis) |
|
The
Autobiographies of A P J ABDUL KALAM (PhD Thesis) |
|
Educational
Thoughts and Ideas of A P J Abdul Kalam An analytical study (PhD Thesis) |
|
A study of
thinking on education of A P J ABDUL KALAM (PhD Thesis) |
|
राष्ट्र निर्माण मे डॉ ए पी जे
अब्दुल कलाम के शिक्षा दर्शन का विश्लेषणात्मक अभ्यास (PhD
Thesis) |
|
Dr. Apj Abdul Kalam Inspiring
Audio Story |
|
Books Authored Dr. A.P.J Abdul
Kalam |
No comments:
Post a Comment