'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा' हा मूलमंत्र देतानाच 'जाणीवेचा विस्तव विझू देऊ नका'
या डॉ. बाबासाहेबांच्या शिकवणूकीचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. डॉ.
बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार होतेच शिवाय ते महान समाजसुधारक,
न्याय शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ आणि तत्त्वज्ञ देखील होते. स्वतंत्र भारताचे पहिले न्याय
मंत्री असलेल्या बाबासाहेबांनी आयुष्यभर मागासलेल्या आणि दलितांच्या अन्यायाविरूद्ध
आपले आयुष्य वेचले. दलितांचा उध्दारकर्ता असंच त्यांना आजही ओळखलं जातं. महिला आणि
कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. अर्थशास्त्रात
उच्चविद्याविभूषित असलेल्या आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र,
राज्यशास्त्र अशा अनेक विषयांवर संशोधने केली होती. त्यांचे
भारताच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान होते.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व
हक्कांची जाणीव होते. समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व विशद केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे
महत्त्व जाणले होते. ते शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या समाजात जे मागास लोक आहेत
त्यांना सुधरविण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी समाजातील मागास आणि अस्पृश्य
जातिजमातीतील लोकांना स्वतः शिक्षण घेण्यासाठी आणि समाजात घडत असलेल्या वाईट
चालिरीतींचा, गोष्टींचा विरोध करण्यासाठी प्रोत्साहित केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी
लोकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण योगदान
दिले.
डॉ. बाबासाहेबांनी तळागाळातील सर्वसामान्य माणूस सर्वशक्तिनिशी जागा केला.
त्याला आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता व सामर्थ्याची जाणीव करून दिली.
मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. हक्काने जगण्याचे शिकवले. त्यासाठी संघर्षाचे
सत्याग्रह करून समता व न्याय समाजात निर्माण केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः एक न्यायवादी, राजनीतीज्ञ, अर्थशास्त्री,
मानवतावादी, लेखक होते. ते स्वतंत्र भारताचे
पहिले कायदेमंत्री होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील एक महान
व्यक्ती आणि आपल्या देशाचे खरे नायक होते.
या महामानवाचे महान कार्य म्हणजे अखंड देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधीलकीचे
कर्तव्य होय.
१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची
जयंती. डॉ. बाबासाहेबांनी वंचित आणि शोषितांसाठी कार्य केले. त्यांनी
शेतकऱ्यांच्या समस्या, महिलांच्या समस्यांचा अभ्यास करुन उपाय सुचवले. जगातला एकमेव व्यक्ती ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता आपल्या
लेखणीच्या बळावर सामाजिक, राजनीतिक,धार्मिक,अशा अनेक
प्रकारच्या क्रांती घडवून आणली. अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक,महान अर्थशास्त्रज्ञ,जगात भारताची मान आदराने
उंचावणारे विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव, जगातील
आदर्श राज्यघटनाकार,भारतरत्न, डॉ.भीमराव
रामजी आंबेडकर यांच्या कार्यास विनम्र अभिवादन!
डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंती
उत्सवानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा कार्यास विनम्र अभिवादन.! (संदर्भ:इंटरनेट व
विविध लेख)
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर ग्रंथसंपदा :
1 |
Writings & Speeches of Dr.
Babasaheb Ambedkar |
|
2 |
INDIAN CONSTITUTION |
|
3 |
भारताचे संविधान |
|
4 |
Dr. B. R. Ambedkar Audio
files |
|
5 |
Selected Works Of DR. B. R.
AMBEDKAR |
|
6 |
THE ANNIHILATION OF CASTE |
|
7 |
Buddha and his Dhamma |
|
8 |
Books on Dr Babasaheb Ambedkar |
|
9 |
Dr. Bhimrao Ambedkar –His
Life and Work (Book) by M.L. Sahare (1988) |
|
10 |
Dr. Ambedkar Life and
Mission (Book) by Dhananjay Keer (1954) |
No comments:
Post a Comment