महाराष्ट्र दिनाचा
इतिहास :-
जेव्हा इंग्रजाकडून
भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशाची प्रादेशिक घटना खूप वेगळी होती. शेकडो राज्ये एकवटली गेली
आणि देशाच्या कारभारासाठी राज्य व्यवस्था स्थापन करावी लागली.१९५६ मध्ये, राज्य पुनर्गठन अधिनियमाने भाषेच्या आधारे भारतातील राज्यांच्या मर्यादा
निश्चित केल्या. आज बरीच नवीन राज्ये आपल्या परिचयाची आहेत, पण
त्यात मराठी, गुजराती, कच्छी आणि
कोंकणी अशा दोन भाषिक गटांचा समावेश असलेल्या भाषा बोलणाऱ्या मुंबई राज्यासारख्या
विसंगती निर्माण झाल्या. या मतभेदांमुळे बॉम्बे स्टेटला
दोन राज्यात विभागण्यासाठी एक चळवळ उभी राहिली – एक म्हणजे
लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्छी बोलतात आणि दुसरे जेथे लोक प्रामुख्याने मराठी
आणि कोंकणी बोलतात. परिणामी, महाराष्ट्र
आणि गुजरात ही राज्ये २५ एप्रिल १९६० रोजी संसदेतर्फे लागू करण्यात आलेल्या बॉम्बे
पुनर्गठन अधिनियम १९६० नुसार अस्तित्त्वात आली. हा कायदा १ मे १९६० रोजी अंमलात
आला. बॉम्बे पुनर्गठन अधिनियमांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात विभागले गेले आणि
दोन्ही स्वतंत्र राज्ये झाली.
कामगार दिनाचा इतिहास :-
कामगार दिन साजरा करण्याची सुरुवात कामगारांच्या हितानिमित्त झालेल्या एका
चळवळीतून झाली. १९ व्या शतकाच्या मध्यावर कामगारांच्या एका तीव्र चळवळीला सुरूवात
झाली. ज्यात कामगारांच्या हितासाठी काही मागण्या
करण्यात आल्या होत्या. पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांनी
केली होती. दिवसाचे कामाचे तास ठराविक असावेत यासंदर्भात ही मागणी होती.
ऑस्ट्रेलिया पाठोपाठ पुढे मग अमेरिका, कॅनडामधील कामगार
संघटनांनी पुढाकार घेत १९८६ मध्ये कामगारांच्या हितासाठी
मोर्चे काढण्यास सुरुवात केली. अशाच एका मोर्च्यामध्ये शिकागो मधील सहा आंदोलकांचा
मृत्यू झाला. ज्याबद्दल कामगारांनी तीव्र निषेध व्यक्त केला. पोलिसांवर राग व्यक्त
करण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने बॉंम्ब टाकला आणि
त्यात आठ पोलिसांचा मृत्यू आणि पन्नास पोलीस जखमी झाले होते. याची शिक्षा म्हणून
आठ आंदोलन कर्त्यांना फाशी देण्यात आली होती. मात्र त्यामुळे जगभरात संतापाची लाट
पसरली कारण त्या आठ जणांपैकी एकानेही बॉंम्ब फेकलेला नव्हता. या रक्तरंजित
इतिहासानंतर या आंदोलनाला एक भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले. १९९० ला कामगारांची
ही चळवळ यशस्वी झाली. शिकागोमधील या घटनेचे स्मरण करण्यासाठी रेमंड लेविन यांनी
आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी केली. त्यांनी ही मागणी १९८९ साली
आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरीस परिषदेत केली होती. त्या परिषदेमध्ये १ मे
१८९० हा दिवस जागतिक एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. पुढे
१८९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक मान्यता देण्यात आली. ज्यामुळे
आज जगभरात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.
०००
No comments:
Post a Comment